IMG-20260717-WA0009

म्हारोळा, छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

रासायनिक खतांचा वापर टाळून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी म्हारोळा येथे तूर पिकावरील नैसर्गिक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. द्वारकामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या शेतीशाळेत परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. जारवाल साहेब, द्वारकामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे डायरेक्टर नितीन श्रीकृष्ण देशमुख, आत्माचे प्रतिनिधी श्रीमती आशा बर्गे, कृषी सहाय्यक श्रीमती जे. एस. पिंपरिये, तसेच श्री. पी. एस. शिंदे आणि श्री. ए. एस. गुरसुडे उपस्थित होते. उपस्थित तज्ज्ञांनी तूर पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांवरील व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य सुधारण्याचे उपाय आणि रासायनिक शेतीऐवजी नैसर्गिक शेतीचे फायदे यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचे तंत्र अवलंबून उत्पादन खर्च कमी करण्याचा आणि पर्यावरणपूरक शेती करण्याचा संकल्प व्यक्त केला. आयोजकांनी उपस्थित शेतकरी, मार्गदर्शक व मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *