फुलंब्री | प्रतिनिधी
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार फुलंब्री तालुक्यात युवासेनेच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
माझे मार्गदर्शक नेते आमदार विलास बापू भुमरे यांच्या शुभाशीर्वादाने तसेच युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे यांच्या सहकार्याने युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी भाऊ भंगुरे यांनी भारत भुमे यांची फुलंब्री युवासेना तालुका अध्यक्ष म्हणून, तर मंगेश गुंजाळ यांची फुलंब्री युवासेना शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
या नियुक्तीमुळे फुलंब्री तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून युवकांमध्ये पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीनंतर भारत भुमे आणि मंगेश गुंजाळ यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी तसेच जनहिताची कामे अधिक जोमाने राबविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.