छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
‘निला सलाम’चे मुख्य संपादक समीर वायचाळ यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर जवळील आप्पावाडी येथील द्वारकाधीश आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रमाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आश्रमाचे संस्थापक व मार्गदर्शक परमपूज्य स्वामी डॉ. विशालानंद सरस्वतीजी महाराज यांनी आश्रमात सुरू असलेल्या वेदशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वारकरी शिक्षण संस्था, गोसेवा आणि मंदिर बांधकाम यांसारख्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
तसेच, या सेवाभावी कार्यासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्य संपादक समीर वायचाळ यांनी आश्रमाच्या कार्याचे कौतुक करत, समाजहितासाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा सामाजिक व आध्यात्मिक कार्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून योग्य प्रसिद्धी देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.