छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:
दि. २२ जून २०२६ रोजी परिमंडळ-२ येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या मा. श्री. रत्नाकर नवले यांची दामिनी महिला संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. यावेळी महिला व तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दक्षता समिती सदस्यांसोबत संवाद साधत महिलांच्या सुरक्षिततेसह सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी दामिनी महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रा. जयश्री शिर्के व समितीच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच या भेटीसाठी सहकार्य केल्याबद्दल खटावकर सर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.प्रा. जयश्री शिर्के या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांनी एम.ए., एम.फिल. (पत्रकारिता) शिक्षण पूर्ण केले आहे व सध्या पीएच.डी.चे शिक्षण घेत आहेत. त्यांचा संशोधन विषय महिला अन्याय व अत्याचाराशी संबंधित आहे. गेल्या २५ ते २६ वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या चळवळीत त्यांनी रणरागिणीप्रमाणे भूमिका बजावली आहे.महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि शोषणाविरोधात सातत्याने लढा देत त्यांनी अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक कार्य करत असताना त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले, मात्र कोणत्याही दबावाला न जुमानता त्यांनी आपले कार्य अखंड सुरू ठेवले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महिला दक्षता समिती, झोन-२ मध्ये दामिनी महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.दामिनी महिला संघर्ष समिती ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेशी सुमारे २५ ते ३० हजार महिला जोडलेल्या आहेत. सर्व जाती-धर्मांच्या महिलांना एकत्र आणून समाजातील अन्याय, अत्याचार आणि महिलांच्या प्रश्नांवर ही संस्था सातत्याने कार्यरत आहे.समितीच्या कार्यामध्ये सचिव अक्षता दाभाडे, कार्याध्यक्ष आयेशा शेख, उपाध्यक्षा रेखा शिर्के, तसेच सदस्य प्रज्ञा कांबळे, जयश्री खरात, अंजली शिर्के, मंगल शिर्के, समीना शेख, रुबीना शेख, मास्तर पठाण, अस्मा शेख, सर्वदबी शेख आदींचा सक्रिय सहभाग आहे.समाजातील महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण, अन्याय किंवा अत्याचाराचा सामना करावा लागत असल्यास त्यांनी दामिनी महिला संघर्ष समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा प्रा. जयश्री शिर्के यांनी केले.संपर्क : प्रा. जयश्री शिर्के (अध्यक्षा, दामिनी महिला संघर्ष समिती) – ९८६०९१०३१३