छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी ह्यूमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डॉ. अन्सारी सर, गोसावी सर, मेराज
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
ह्यूमन राईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डॉ. अन्सारी सर, गोसावी सर, मेराज अन्सारी सर आणि दिल्ली येथील सर्व मान्यवरांची उपस्थिती नुकतीच लाभली. या महत्त्वाच्या बैठकीत ॲड. रवी तायडे यांची ‘ह्यूमन राईट्स’च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
ॲड. रवी तायडे यांच्या मानवी हक्कांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत, सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. त्यांची या पदावरील फेरनिवड झाल्यामुळे कायदेतज्ज्ञ आणि वकील वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या आनंदाच्या प्रसंगी ॲड. विजय जाधव साहेब, ॲड. हिंगोले साहेब, ॲड. सागर मोरे साहेब, ॲड. एडके साहेब, ॲड. इंगळे साहेब, ॲड. साडवे साहेब, ॲड. तात्या पटेकर साहेब, ॲड. डोंगरदिवे साहेब, ॲड. नागरे साहेब, ॲड. चालक साहेब, ॲड. नवाब साहेब, ॲड. शेख साहेब, ॲड. मिलिंद पाटील साहेब, ॲड. खोले साहेब, ॲड. चव्हाण साहेब, ॲड. जोधले मॅडम, ॲड. भाग्यश्री मॅडम आणि ॲड. रमा मॅडम यांच्यासह अनेक वकिलांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियावरून अभिनंदन केले आहे.
सर्वांनी त्यांना पुढील मानवाधिकारविषयक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.